03 June 2020

News Flash

मालवणीत चाकूने भोसकून एकाच घरातील तिघांची हत्या

मालवणीमधील न्यू कलेक्टर कॉलनी परिसरात घडली घटना

पुण्यातील संगणक अभियंता अंतरा दास मृत्यू प्रकरणी तिच्या मित्रास अटक करण्यात आली आहे

मालवणीमध्ये अज्ञातांने चाकूने भोसकून बुधवारी रात्री एकाच घरातील तिघांची हत्या केली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर परिसरात खळबळ उडाली.
मालवणीमधील न्यू कलेक्टर कॉलनी परिसरातील प्लॉट क्रमांक २३मध्ये एका खोलीमध्ये हा प्रकार घडला. यामध्ये बबली शॉ (वय ४७), आर्यन शेख (वय १३) आणि सानिया शेख (वय ८) यांचा मृत्यू झाला. आर्यन आणि सानिया ही बबली शॉ यांची नांतवडे असल्याची माहिती मिळते आहे. बुधवारी रात्री उशीरा हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मुंबई पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2016 12:09 pm

Web Title: three murders in malvani at mumbai
Next Stories
1 मि. राऊत, कधी काडीमोड घेताय? भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींचा सवाल
2 भ्रष्ट पोलिसांवरील कारवाईच्या ५३ फायली एसीबीकडून परत!
3 भोसरी जमीन खरेदीप्रकरणीच झोटिंग यांच्याकडून चौकशी
Just Now!
X