News Flash

बाळगंगा नदीत गोवंडीचे तीन तरूण बुडाले

पेण तालुक्यातील बाळगंगा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या तीन तरूणांचा रविवारी बुडून मृत्यू झाला.

| August 12, 2013 03:47 am

पेण तालुक्यातील बाळगंगा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या तीन तरूणांचा रविवारी बुडून मृत्यू झाला. हे तिघेही गोवंडीतील शिवाजीनगरचे रहिवासी आहेत. पेणच्या बाळगंगा नदीच्या तीरावरील दग्र्याला भेट देण्यासाठी मुंबईतून मोठय़ा संख्येने मुस्लीम येत असतात. गोवंडीतील २० ते २२ जण येथे आले होते. रविवारी सकाळी ते आंघोळीसाठी नदीत उतरले, त्यातील महम्मद इद्रीस शेख (२२) हा तरूण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ महंमद कलीम इद्रीस शेख (२१) आणि राज महम्मद नझीर शहा (२०) हे दोघेही पाण्यात उतरले. मात्र, या प्रयत्नात हे दोघेही बुडाले. मित्रांचा ठावठिकाणा लागत नसल्याने इरफान शम्मी अल्ला खान याने पोलिसांकडे तक्रार केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 3:47 am

Web Title: three of govandi drown in balganga river
Next Stories
1 मुंबईच्या प्रश्नांवरील समन्वय बैठकीचा मुहूर्त टळला सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेची संधी हुकली
2 मंत्रालयात पडून मजुराचा मृत्यू
3 शिवडी-न्हावाशेवा सेतूसाठी ‘जेएनएनयूआरएम’चाही पर्याय
Just Now!
X