निदान होईपर्यंत भटकं तीमुळे नागरिकांची चिंता वाढली

मुंबई : उच्च न्यायालयाने जामीन मंजूर के ल्यावर आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटलेल्या चारपैकी तीन कै द्यांना करोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले. हे तिघे कु र्ला पुर्वेकडील दाट लोकवस्ती असलेल्या भागात परतले आणि अहवाल येईपर्यंत परिसरात भटकलेही. रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने चौघांनाही घरातल्याघरात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

या कै द्यांनी सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्याने उच्च न्यायालयात अर्ज के ला. ६ मेला न्यायालयाने अर्ज मंजूर के ला. त्याच दिवशी त्यांना कारागृहाबाहेर सोडले. मात्र त्याआधी त्यांची जेजे रुग्णालयात करोनाची चाचणी करून घेण्यात आली. चाचणी अहवाल दोन दिवसांनी हाती आले. त्यात तिघांना लागण झाल्याचे निदान होते.

अहवाल हाती येईपर्यंत यातील एकाने व्यावसायिक, वैयक्तिक कारणांसाठी दोन दिवसांत बरीच भटकं ती के ली. चाचणी अहवाल मिळाल्यानंतर तिघांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र खाट उपलब्ध नसल्याने तिघांना घरीच कोंडून ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. यामुळे या व्यक्ती वास्तव्यास असलेल्या इमारतींमध्ये घबराट पसरली आहे. इमारतीतल्या रहिवाशांनीही त्यांना रुग्णालय किं वा विलगीकरण केंद्रात न्यावे, संपूर्ण इमातरीचे निर्जंतुकीकरण करावे यासाठी धडपड करत आहेत.

याबाबत एम पश्चिम विभाग कार्यालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा के ली असता, उपलब्धतेनुसार प्रत्येकालाच रुग्णालय, विशेष केंद्रांत दाखल करून घेतले जात आहे. तिघांपैकी एका व्यक्तीला विवेकानंद महाविद्यालयातील केंद्रात आणण्यात आल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हे आरोपी कुल्र्यातील ‘त्या’ प्रकरणातले

हे तिघेजण कु र्ला येथील एका तरूणीच्या बेपत्ता झाल्याने उडालेल्या गोंधळ प्रकरणातील आहेत. या मुलीचा शोध लागत नसल्याने वडिलांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर कुटुंबासह परिसरातील नागरिकांनी पोलिस ठाण्याबाहेर जोरदार निदर्शने केली. या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला तुंबळ गर्दी उसळली. वाटेत जमावाने दगडफे क केली. पोलीस वाहने फोडली. पोलिसांवर हातही उगारला. या प्रकरणात चेंबुर पोलिसांनी सुमारे ६० ते ७० व्यक्तींना अटक केली होती. त्यात या तिघांचा समावेश होता.

आकडा १८५वर

आर्थररोड कारागृहातील बाधीत कै द्यांचा आकडा १८५वर गेल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट के ले. राज्यातील कारागृहांमध्ये एकू ण ३५ हजार कै दी बंद आहेत. कारागृहात करोनचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी किरकोळ गुन्ह्य़ांतील किं वा सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या निम्म्या कै द्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडले जाईल, असे स्पष्ट के ले. मात्र या योजनेची अंमलबजावणी करताना आर्थररोड, भायखळा येथील महिला कारागृहात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. येथून तात्पुरता जामीन किं वा पॅरोलवर सुटणारा प्रत्येक कै दी करोनाबाधीत नाही ना, याची खात्री करूनच सोडावा लागेल.