News Flash

मातोश्री’बाहेर तैनात असलेल्या तीन पोलिसांना करोनाची लागण

या तीन पोलिसांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत

संग्रहित

मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरील तीन पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. हे पोलीस कर्मचारी मागील काही दिवसांपासून इथे कार्यरत आहेत. याआधी मातोश्री परिसरातल्या चहावाल्याला करोनाची लागण झाली होती. दरम्यान करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन पोलिसांवर उपचार करण्यात येत आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या या पोलिसांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कला नगर भागातील सगळ्या पोलिसांनी पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात येते आहे. याआधी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये सगळ्या पोलिसांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली होती.

दरम्यान मुंबईत शुक्रवारी करोनाग्रस्तांची संख्या ७ हजार ६०० च्या पुढे गेली आहे. तर आत्तापर्यंत एकट्या मुंबईत २९५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेण्यात येते आहे. सोशल डिस्टन्सिंग, करोना प्रतिबंधित क्षेत्र, करोनाशी संबंधित चाचण्या वाढवणं हे सगळं केलं जातं आहे. तरीही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावर सरकार आणि मुंबई महापालिका सर्वतोपरी उपाय योजण्याचे प्रयत्न करते आहे.

२२ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या बंगल्यावर तैनात असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकालाही करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यावेळी या सहाय्यक निरीक्षकाच्या संपर्कात असलेल्या सहा जणांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. तर वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर आता मातोश्रीबाहेर तैनात असलेल्या तीन पोलिसांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 2:40 pm

Web Title: three police outside matoshri were infected with corona virus scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मोदी सरकारवर टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण – देवेंद्र फडणवीस
2 कुटुंबाचा मृतदेहासोबत मुंबई ते कर्नाटकपर्यंत प्रवास, तपासणी केली असता तिघांना करोनाची लागण
3 आता कोकीळेचा आवाजही कोविड कोविड येऊ लागलाय: राज ठाकरे
Just Now!
X