मुंबईमधील उल्हासनगर भागातील झुलेलाल प्रशालेत  एक वर्ग सुरू असताना, अचानक या खोलीच्या छताचे सिमेंटचे प्लास्टर कोसळले व ते वर्गात बसलेल्या विद्यार्थीनींच्या अंगावर पडले. यामध्ये तीन विद्यार्थीनींच्या डोक्यावर प्लास्टरचा भाग पडल्याने त्या जखमी झाल्या आहेत.