नवी मुंबई पालिकेच्या वाशी येथील मलनि:सारण केंद्राची सफाई करताना बुधवारी तीन साफसफाई कामगारांना वायुबाधा झाली. त्यांना जवळच्या फोर्टिस व एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
नवी मुंबई पालिकेच्या वाशी येथील मलनि:सारण केंद्राची काही महिन्यांनंतर साफसफाई केली जाते. व्यंकप्पा (५०), पी. कृष्णा (४७) आणि रामशब्द (४५) या घारपुरे इंजिनीअरिंग कंपनीच्या कामगारांनी बुधवारी वरिष्ठांची वाट न पाहता साफसफाईला सुरुवात केली. ३० फूट खोलवर हे कामगार उतरले असताना त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांना अन्य कामगारांनी बाहेर काढले, परंतु तोवर ते बेशुद्ध झाले होते.