महाविद्यालयीन तरुणी आणि पेशाने वकील असलेल्या मुलीवर अश्लील शेरेबाजी करणे पाच तरुणांच्या चांगलेच अंगलट आले. पीडित तरुणीने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली. त्यानंतर या तीन तरुणांना पोलीस कोठडीची हवा खावी लागल्याची घटना जुहू परिसरात घडली. जुहू पोलिसांनी वकील असलेल्या तरुणीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार, विजय लक्ष्मण राणीम, विकास लालचंद सोनकर आणि श्रावण संतोष लाड यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी रस्त्यावरून जाणाऱ्या आणि वकील असलेल्या तरुणीवर या तिघांनी अश्लील शेरेबाजी केली. पीडित तरुणी अंधेरीतील आपल्या मैत्रिणीला भेटून जुहू-विलेपार्ले बसस्थानकाजवळील जेव्हीपीडी सिग्नलजवळ रिक्षा पकडण्यासाठी आली. त्यावेळी अटक करण्यात आलेले आरोपी एका कारमधून जात होते.

दरम्यान, गाडी चालविण्यावरून त्यांचा रिक्षा चालकाशी वाद झाला. वाद संपवून रिक्षा चालक तरुणीला घेऊन निघाले असताना रिक्षाचा पाठलाग करून कारमधील या रोड रोमियोंनी रिक्षातील तरुणीला टार्गेट करीत तिच्यावर अश्लील शेरेबाजी करीत तिचा विनयभंगही केला.

या घटनेनंतर पीडित तरुणीने रिक्षा थेट जुहू पोलीस ठाण्यात नेली आणि घडलेला प्रकार पोलिसांसमोर सांगितला. जुहू पोलिसांनी वकील तरुणीच्या तक्रारीची दखल घेत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्या तिघा रोमियोंना ताब्यात घेतले. अधिक तपास जुहू पोलीस करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three youth arrested for molestation of advocate girl
First published on: 14-11-2018 at 23:51 IST