प्रवाशांना आणखी पर्याय देणार

मुंबई: मोबाइल तिकिटिंग यंत्रणा अधिक सक्षम व सुकर करण्यासाठी डिजिटल पेमेंट अ‍ॅपचे अधिक पर्याय बेस्ट उपक्रमाकडून उपलब्ध केले जाणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव बेस्टने तयार केला असून तो लवकरच बेस्ट समितीसमोर मंजुरीसाठी येईल.

सध्या बेस्ट प्रवाशांना तिकीट उपलब्ध करण्यासाठी वाहकांकडे ईटीआयएम मशीन उपलब्ध करण्यात आले आहे. याबाबत रिडलर कंपनीकडून ट्रायमॅक्स कराराच्या कालावधीमध्ये मोबाइल तिकिटिंग बसपास देणे आणि त्याबाबतचा पुनर्भरणा करणे याकरिता सर्व बसमार्गावरील प्रवासी भाडे आधारित अ‍ॅप यापूर्वीच विकसित करण्यात आले आहेत. मोबाइल तिकिटिंगला साहाय्य पुरवण्यासाठी मोबाइल अ‍ॅपद्वारे प्रत्यक्ष पास देण्यासाठी आणि मोबाइल पाससाठी अ‍ॅप कार्यरत आहे. मोबाइल तिकिटिंग यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे विचाराधीन आहे. त्यामुळे पेटीएम, गुगल पे, मोबीविक इत्यादीसारख्या अन्य डिजिटल पेमेंट अ‍ॅप्लिकेशनचा पर्याय बेस्टकडून देण्यात येणार आहे. यातून प्रवाशांना क्रेडिट व डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि प्रीपेड कार्डद्वारे तिकिटांचे पैसे अदा करता येतील.