News Flash

डोंबिवली स्थानकात ट्रेन घसरली; मध्य रेल्वेची वाहतूक विस्काळीत

डोंबिवली स्थानकात मंगळवारी लोकल ट्रेनचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेच्या पुन्हा ये रे माझ्या मागल्या कारभाराचा अनुभव येताना दिसला.

| September 30, 2014 01:04 am

डोंबिवली स्थानकात मंगळवारी लोकल ट्रेनचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेच्या पुन्हा ये रे माझ्या मागल्या कारभाराचा अनुभव येताना दिसला. कल्याणच्या दिशेने जाणारी टिटवाळा लोकल डोंबिवली स्थानक सोडत असताना हा प्रकार घडला. त्यामुळे सुमारे एक तास मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूकीचा पूर्णपणे खोळंबा झाला होता. या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अजूनही ३ ते ४ तासांचा अवधी लागणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेवर वारंवार तांत्रिक बिघाड, गाड्यांचे डबे घसरण्याचे प्रकार पहायला मिळत आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 1:04 am

Web Title: titwala local derails at dombivli station
टॅग : Central Railway
Next Stories
1 ‘पृथ्वीराज चव्हाण बिल्डरधार्जिणे’
2 ‘सप्टेंबर हीट’!
3 महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट
Just Now!
X