मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. करोना व्हायरसची दहशत राज्यभरात आहे. मुंबईत लोकल स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकिट १० रुपयांवरुन ५० रुपये करण्यात आलं आहे. मुंबईतील २०० स्थानकांवर या तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत असंही समजतं आहे.

करोनाचे महाराष्ट्रात ३९ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये मुंबई आणि पुण्यातले रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. मुंबईतली गर्दी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर १० रुपयांवरुन थेट ५० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त मुंबईच नाही तर पुणे, सोलापूर या ठिकाणीही प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.