भांडवली बाजारात ‘सेन्सेक्स-निफ्टी’ची सुवर्ण दौड सुरू आहे. समभाग गुंतवणुकीबाबत सध्या आशेची तोरणे बांधली जात आहेत, तर म्युच्युअल फंड गुंतवणुकीला नफावसुलीचे ग्रहण लागले आहे. गुंतवणुकीतील या उलटफेरीची कारणे आणि करोनाकाळातील गुंतवणुकीबाबतचे दिशादर्शन ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमातून आज होईल.

सनदी लेखापाल आणि ‘सेबी’कडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार असलेल्या तृप्ती राणे यांच्याशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून आज, मंगळवारी सायंकाळी ५ वाजता संवाद साधण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांमध्ये जागराच्या उद्देशाने आयोजित या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमात, गुंतवणूकदारांना आपल्या मनातील प्रश्न आणि शंका तृप्ती राणे यांना विचारता येतील.

सध्याच्या अस्थिर आणि अनिश्चिततेच्या काळात, गुंतवणुकीत करावयाचे फेरबदल आणि नव्याने विचारात घ्यावयाचे पर्याय यांची चाचपणी करण्यास गुंतवणूकदारांना हे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे. कुटुंबाचा अस्थिर खर्च आणि उत्पन्नाचे गणित जुळवणारे आर्थिक नियोजन आणि त्या अनुषंगाने गुंतवणुकीच्या वर्तनात करावयाचे बदल याचा वेधही या माध्यमातून गुंतवणूकदार- वाचकांना घेता येईल.

सहभागासाठी येथे नोंदणी आवश्यक

https://tiny.cc/LS_Arthasalla_15Sept