News Flash

पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री, मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

रविवारी मध्य रेल्वेवर मार्गासह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री १२.४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जलद आणि धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

विविध कामांसाठी दर रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेवर मात्र शनिवारी रात्रीच घेण्यात येणार आहे. तर मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारh मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने दोन्ही मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री १२.४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जलद आणि धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे चर्चगेटवरुन बोरिवली, विरारकडे जाणाऱ्या सर्व लोकल रद्द कऱण्यात आल्या आहेत.

तर उद्या मध्य रेल्वेवर मार्गासह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गांवरील काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगाब्लॉक काळात मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कल्याण-ठाणे दरम्यान धिम्यागतीच्या सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१५ ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटी ते पनवेल, वाशी बेलापूर दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच सीएसटीहून वांद्रेकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्याही याकाळात रद्द करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 10:46 pm

Web Title: today mega block on western railway and tomorrow on central and harbor
Next Stories
1 सोंगाड्याने बुलेट ट्रेनची काळजी करू नये, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला
2 चेंबूरमधील आर. के. स्टुडिओत भीषण आग
3 भुयारी गटारद्वार उघडण्यामागे स्थानिक कार्यकर्ते
Just Now!
X