02 March 2021

News Flash

रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक, मुंबईकरांनो गरज असेल तरच बाहेर पडा

रेल्वेच्या विविध कामांनिमित्त रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.

रेल्वेच्या विविध कामांनिमित्त रविवारी, ७ एप्रिल रोजी मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप धिमा मार्ग, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वे माहीम ते गोरेगाव दरम्यान अप व डाऊन, हार्बर मार्गावर ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या पंधरा मिनिटे उशिराने धावतील.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग

कुठे – मुलुंड ते माटुंगा अप धिमा मार्ग

कधी – स. ११.१० ते दु.३.४० वा.

परिणाम – ब्लॉकमुळे मुलुंड ते माटुंगादरम्यान अप धिम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन या स्थानकांत थांबतील. सर्व मार्गावरील लोकल उशिराने धावतील.

हार्बर मार्ग

कुठे – कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावर

कधी – स.११.१० ते दु.३.४० वा

परिणाम – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहतील. पनवेल ते वाशी व कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

कुठे – माहीम ते गोरेगावदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्ग

कधी – स.११ ते सायं.४.००

परिणाम – ब्लॉकमुळे गोरगाव लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरून सुटणाऱ्या लोकलही रद्द राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 8:17 am

Web Title: today megha block on the three railway lines
Next Stories
1 रेल्वे स्थानकात गर्दी व्यवस्थापनासाठी जादा कुमक
2 शीव रुग्णालयात सात वर्षांच्या मुलीवर दुर्मीळ हृदय शस्त्रक्रिया!
3 अत्याचार करून बालिकेची हत्या
Just Now!
X