24 November 2020

News Flash

जनाची मनाची आहे, म्हणूनच … – संजय राऊत

विरोधकांच्या टीकेवर साधला निशाणा, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत

संग्रहीत

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज विजयादशमी निमित्त होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीका टिप्पणीला उत्तर दिले आहे. ”बिहारमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी, मतांसाठी लाखोंचे मेळावे चालतात. पण महाराष्ट्रातील एका ऐतिहासिक दसरा मेळावासाठी जनाची मनाची काढली जाते? ठीक आहे, जनाची मनाची आहे, म्हणूनच हा मेळावा शिवतीर्थाच्या बाजूच्या वीर सावरकर सभागृहात आम्ही घेत आहोत.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

विरोधक म्हणत होते की दसरा मेळावा घेण्याची काय गरज आहे? जनाची नाहीतर मनाची अशा पद्धतीने वक्तव्यं होत होती. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”हे मोहनराव भागवतांना देखील लागू पडतं का? सरसंघचालक हे आमचे आदरणीय आहेत. आज त्यांनी देखील म्हणजे संघाने देखील रेशीमबागेतील एका सभागृहात ज्या पद्धतीने शिवसेनेचा मेळावा आम्ही घेतो, त्या पद्धतीनेच सरसंघचालकांनी मेळावा घेतलेला आहे. आता जनाची आणि मनाची ही कुणी कोणाची काढायची आणि ठेवायची? आम्ही नियम व कायद्याचे पालन करत आहोत. सरसंघचालक आमचे आदर्श आहेत. जर जनाची मनाची जर पाहायचीच असेल, तर बिहारमध्ये जे ५०-५० हजार व लाखांच्या संख्येने मेळावे चालले व सर्वच राजकीय पक्षाचे नेते, अगदी भाजपासह आमच्या पंतप्रधानांसह जे हजारोंचे मेळावे चाललेत. तिथं जनाची, मनाची, तनाची, धनाची कसली लाज बाळगायची?, निवडणुका जिंकण्यासाठी, मतांसाठी लाखोंचे मेळावे चालतात पण एक ऐतिहासिक दसरा मेळावासाठी जनाची मनाची काढली जाते? ठीक आहे, जनाची मनाची आहे, म्हणूनच हा मेळावा शिवतीर्थाच्या बाजूच्या वीर सावरकर सभागृहात आम्ही घेत आहोत.” एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत यांनी हे विधान केलं आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, ”जसा २०१९ चा दसरा मेळावा हा आमच्यासाठी महत्वाचा होता. कारण, विधानसभा निवडणुका आम्हाला समोर दिसत होत्या आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात विधानसभेवर केवळ भगवाच फडकवायचा नाहीतर, पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, हा विचार डोक्यात ठेवून आम्ही दसरा मेळावा झाला होता.”

तसेच, ”निवडणूक निकालानंतरचं माझं जे काय सततचं वक्तव्यं होतं की, मुख्यमंत्री शिवसेनेचाच …मुख्यमंत्री शिवसेनेचाच… याचं बीजं ही मागील दसरा मेळाव्यात रोवल्याची आपण पाहिलं असेल. आज महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आजच्या दसऱ्य़ा मेळाव्याला आमच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. आज व्यासपीठावर केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीचं बोलणार नाहीत, तर आमचे शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री या भूमिकेत असलेले उद्धव ठाकरे आज मार्गदर्शन करतील. करोनाचं संकट आहे. ते देशभरात व जगभरात आहे. जर हे करोनाचं संकट नसतं, तर, आज शिवतीर्थ अपुरं पडलं असतं. मुख्यमंत्र्यांचं संबोधन ऐकण्यासाठी शिवतीर्थावर अक्षरश: तुफान महापूर आला असता. पण तरी आज वीर सावरकर सभागृहाच्या व्यासपीठावरून या मेळाव्याचं प्रक्षेपण देशभरता होईल. साधरण ज्या पद्धतीने आम्ही मेळावा साजरा करतो, त्या पद्धतीनेच आम्ही साजरा करू, त्याला नाईलाज आहे.” असं देखील संजय राऊत यांनी सांगितलं..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 10:40 am

Web Title: todays dussehra melava is important for us and maharashtra msr 87
Next Stories
1 कसा असेल शिवसेनाचा दसरा मेळावा, संजय राऊतांनी दिली माहिती
2 करोनामुळे १० हजारांपेक्षा अधिक मृत्यू झालेले मुंबई हे देशातील पहिले शहर
3 शिवसेनेचा आज दसरा मेळावा
Just Now!
X