पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील उदंचन केंद्रामधील झडपांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे ८ जुलै रोजी शीव ते मुलुंडसह पालिकेच्या एफ-उत्तर, एफ-दक्षिण विभागांमध्ये, तसेच काही अंशी बी आणि ई विभागात १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
बगरबाह्य विभागाच्या पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील टप्पा-३ व टप्पा-३ ए उदंचन केंद्रातील १८०० मि.मी. व्यासाच्या झडपांच्या दुरुस्तीचे काम ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम मध्यरात्री १२ वाजता पूर्ण होईल, अशी अपेक्षा पालिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे. या कामामुळे ८ जुलै रोजी शीव ते मुलुंड, तसेच एफ-उत्तर व एफ-दक्षिण विभागामध्ये १५ टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर बी आणि ई विभागात काही परिसरात १५ टक्के पाणीकपात करावी लागणार आहे.