करोनामुळे स्पर्धा परीक्षार्थ्यांपुढे अनेक आव्हाने उभी आहेत. शहरांत राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना करोनामुळे पुन्हा गावाकडे परतावे लागले आहे. अभ्यासिका आणि वाचनालयाची पुरेशी सुविधा नसल्याने शहरातील विद्यार्थ्यांचीही अडचण झाली आहे. त्यामुळे अभ्यास कसा करावा, अभ्यास साहित्य कसे मिळवावे, या कठीण काळात मनोबल टिकवून ठेवण्यासाठी काय करावे? असे अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षार्थ्यांना सतावत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरू’ या विशेष वेबसंवादात बुधवार, ८ जुलै रोजी मिळणार आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील या वेबसंवादात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सहभागासाठी https://tiny.cc/LS_SpardhaParikshaGuru_3 या लिंकवर नोंदणी आवश्यक.