मंगळवारी सांयकाळच्या सुमारास शहाडजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काळी काळ विस्कळीत झाली होती. यामुळे कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. आता वाहतूक सुरू झाली असली तर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्याची वाहतूक उशिराने धावत आहे.

ऐन गर्दीच्या वेळी कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. कल्याण-शहाड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेले होते, असे सांगण्यात येते. कल्याण स्थानकात लोकल्ससह एक्स्प्रेस रेल्वे रखडल्या होत्या. विदर्भ एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, मुंबई – नागपूर दुरांतो , पंजाब मेल, अमरावती एक्स्प्रेस, कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल्स यामुळे रखडल्या होत्या. आता वाहतूक सुरू झाली असली तरी ती उशिराने धावत आहे.