News Flash

रस्ता सुरक्षा पंधरवडा

वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन (डब्ल्यूआयएए), प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व वाहतूक पोलीस यांच्यातर्फे आयोजित करण्यात

| January 13, 2015 12:01 pm

वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन (डब्ल्यूआयएए), प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व वाहतूक पोलीस यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा पंधरवडा’चे उद्घाटन आज, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. वाहतूकमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन मरिन ड्राइव्हवरील पोलीस जिमखाना येथे होईल. डब्ल्यूआयएएने या पंधरवडय़ादरम्यान रस्ता सुरक्षेविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यादरम्यान मरिन ड्राइव्ह येथे १५ जानेवारीपर्यंत सर्व गाडय़ांची मोफत पीयूसी व इलेक्ट्रिक तपासणी केली जाईल. सार्वजनिक वाहतूक सेवेतील चालकांना डब्ल्यूआयएएतर्फे मोफत प्रशिक्षणही यादरम्यान दिले जाणार आहे.१७ जानेवारीला  कूपरेज ट्रॅफिक पार्क येथे चित्रकला स्पर्धा घेतली जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 12:01 pm

Web Title: traffic dept rto gear up for safety fortnight
Next Stories
1 विद्यार्थ्यांचा भार हलका करण्यासाठी राज ठाकरे ‘वर्षा’वर
2 केंद्राच्या धर्तीवर राज्यातही कौशल्य विकास विभाग
3 मूठभर नेत्यांकडे सत्ता एकवटल्याने फटका
Just Now!
X