मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान रुळाला तडे गेले असल्याची माहिती समोर आली आहे.  सीएसएमटीकडे येणाऱ्या रेल्वे वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे.

या मुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकजण रेल्वे रुळावर उतरून अन्य मार्गाने  निघाले आहेत. रूळाला गेलेल तडे हे बऱ्यापैकी मोठे असल्याने त्यामुळे किमान एक ते दीड तास याच्या दुरूस्तीसाठी लागण्याची शक्यता आहे. हे काम झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होणार आहे.  त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत राहणार असल्याची शक्यता आहे.