मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही तांत्रिक कामानिमित्त आज(दि.९) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेलजवळ ओव्हर हेड गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने याबाबत माहिती दिली.
मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक १२ ते २ या वेळेत बंद राहणार आहे. या वेळेत या मार्गावरील सर्व प्रकारची जड आणि मालवाहतूक करणारी वाहने एक्सप्रेस वे वरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी ५२ किमी अंतरावर थांबवण्यात येतील. तर चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाक्यावरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना पर्यायी मार्गांचा विचार करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
यापूर्वी २६ सप्टेंबरला काही तांत्रिक दुरुस्तीसाठी मुंबई-पुणे महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
First Published on October 9, 2019 11:31 am