05 March 2021

News Flash

भरधाव त्रिकुटाला रोखणाऱ्या वाहतूक पोलिसास उडविले

मोटारसायकलीवरून जाणाऱ्या तिघांना थांबविण्याचा प्रयत्नात असलेल्या एका वाहतूक पोलिसाला त्या मोटारसायकलीने धडक देऊन पळ काढला. यात वाहतूक पोलीस हवालदार नितीन नलावडे (२९) हे जखमी झाले

| April 29, 2013 03:19 am

मोटारसायकलीवरून जाणाऱ्या तिघांना थांबविण्याचा प्रयत्नात असलेल्या एका वाहतूक पोलिसाला त्या मोटारसायकलीने धडक देऊन पळ काढला. यात वाहतूक पोलीस हवालदार नितीन नलावडे (२९) हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 शनिवारी संध्याकाळी कांजूरच्या एलबीएस रोडवरील केंद्रीय विद्यालय येथे नलावडे डय़ुटीवर होते. संध्याकाळी ७ च्या सुमारास पल्सर मोटारसायकलीवरून तीन तरुण जात होते.
नलावडे यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोटारसायकल न थांबवता नलावडे यांच्या अंगावर घातली आणि पळून गेले. त्यात नलावडे जखमी झाले असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पार्कसाईट पोलिसांत या मोटारसायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल असून पोलीस त्यांचा शोध आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 3:19 am

Web Title: traffic police hited by speedy three bikers
Next Stories
1 राष्ट्रवादीच्या निवडणूक नीतीला घोटाळे, महागाईचे मोठे आव्हान
2 तटकरे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी वेगात सुरू
3 मुलुंड पाईपलाईन परिसरातील झोपडवासींचे तेथेच पुनर्वसन
Just Now!
X