आठ दिवसांत २० लाखांचा दंड वसूल

मुंबई : वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल झालेला दंड थकविणाऱ्यांच्या घरी भेट देण्यास पोलिसांनी सुरुवात केल्यापासून गेल्या आठ दिवसांत वाहतूक पोलिसांनी दहा हजार किं वा त्याहून अधिक रक्कमेचा दंड थकविणाऱ्या सुमारे चार हजार जणांच्या घराचे दार ठोठावले. त्यातून सुमारे २० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वाहतूक पोलिसांच्या ५० पथकांनी १४ जूनपासून गृहभेटींना सुरुवात केली. रस्त्यांवर तैनात वाहतूक पोलिसांव्यतिरिक्त शहरात बसविण्यात आलेल्या पाच हजार साध्या, अद्ययावत सीसीटीव्ही कॅ मेरेही नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना टिपतात. त्यामुळे मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या, सतत धावत्या शहरात वेगाने ई चलन(दंड) जारी होतात. त्या तुलनेत दंड वसुली मात्र कासवगतीने होते. दंड वसुलीला वेग मिळावा या दृष्टिकोनातून वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत विविध प्रयोग, उपक्र म हाती घेतले. मात्र अपेक्षित यश पदरी न पडल्याने अखेर दंड थकविणाऱ्यांचे घर गाठून, प्रत्यक्ष भेटून वसुली करण्याचा उपक्र म सहआयुक्त यशस्वी यादव यांनी हाती घेतला. १४ जूनपासून वाहतूक पोलिसांच्या ५० पथकांनी गृहभेटी सुरू के ल्या.

आठ दिवसांत वाहतूक पोलिसांनी चार हजारांहून अधिक व्यक्तींची भेट घेतली. यातील सुमारे एक ते दीड हजार व्यक्तींनी पोलीस थेट घरी आल्यावर जागच्या जागी दंड भरला. वाहतूक पोलीस दलाचे उपायुक्त नंदकु मार ठाकू र यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ दिवसांच्या गृहभेटींमध्ये २० लाख आठ हजार रुपयांचा दंड वसूल झाला. ज्यांनी आठवड्याची मुदत मागून घेतली त्यांच्याकडूनही दंड जमा होणे अपेक्षित आहे.

वाहने विकल्यानंतरही मूळ मालकाला नोटीस वाहने कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करून विकल्यानंतरही मूळ मालकांना ई चलन बजावणी होत असल्याचे या गृहभेटींमधून वाहतूक पोलिसांच्या लक्षात आले. वाहन विकत घेणाऱ्या व्यक्तींचे तपशील या पथकांनी गोळा करण्यास सुरुवात केली.

तपशिलांआधारे नव्या मालकांना संपर्क करून खातरजमा के ली जाईल. त्यानंतर नव्या मालकाचे तपशील ई चलन प्रणालीत संबंधित वाहनापुढे नोंद के ले जातील. जेणेकरून नियमभंग के ल्यास ई चलन मूळ मालकाला न जाता नव्या मालकाला मिळू शके ल.

अनेकांनी वाहने दलालांकरवी विकली आहेत. दलालांनी वाहन कोणास विकले याबाबत मूळ मालकांना काहीच माहीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी संबंधित दलालांचे संपर्क क्र मांक मिळवले आहेत. दलालांकडे वाहनविक्रीबाबत चौकशी करून नव्या मालकाचा शोध घेतला जाईल, असे ठाकू र यांनी स्पष्ट के ले.

नोंदणी क्रमांकाचा गैरवापर उघड

प्रत्यक्ष भेटी सुरू के ल्यावर काही व्यक्तींनी संबंधित नोंदणी क्र मांकांची वाहने नियमांप्रमाणे भंगारात काढल्याची माहिती पुढे आली. वाहन भंगारात जमा किं वा नष्ट करूनही त्या नोंदणी क्र मांकावर काही वर्षांपासून ई चलन जारी होत होते. त्यानुसार भंगारात निघालेल्या वाहनांचा नोंदणी क्र मांक अन्य वाहनांना विशेषत: चोरीच्या किं वा गुन्ह्यांत वापर झालेल्या वाहनांना जोडण्यात आला असावा, असे निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदवले. हे सर्व नोंदणी क्र मांक वाहतूक पोलिसांनी संशयास्पद वाहनांच्या यादीत समाविष्ट केले आहेत. वर्षभरात संशयास्पद किं वा बोगस नोंदणी क्र मांक जोडून वावरणारी ३० वाहने पोलिसांनी जप्त के ली आहेत. यातील बहुतांश वाहने चोरीची होती, असे सांगण्यात आले.