News Flash

कांदिवली स्टेशनजवळ रेल्वेची ट्रकला धडक, बॅरिकेड तोडून ट्रक गेला फरफटत

कांदिवली स्टेशनजवळ झाला अपघात

कांदिवली स्टेशनजवळ रेल्वे रुळावर ट्रक आल्याने जोराची धडक होऊन अपघात झाला. ट्रकची मागची बाजू रेल्वे मार्गावर आल्याने ही धडक झाली. या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. पश्चिम रेल्वेमार्गावर कांदिवली स्टेशनजवळ रेल्वे लाइनवर काम सुरु आहे. यासाठी ट्रकमधून आवश्यक ती मालवाहतूक केली जाते. दुपारी साडेबाराच्या सुमारास आलेल्या रेल्वेने या ट्रकला धडक दिली. ट्रकच्या मागच्या बाजूचं नुकसान झालंय शिवाय रेल्वेच्या धडकेमुळे ट्रक फरफटत गेला, दुभाजकाच्या बॅरिकेड तोडून ट्रक पुढे गेला.

या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हटली पाहिजे. दरम्यान या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक त्या उपाय योजना केल्या. दरम्यान रेल्वे लाइनचं काम सुरु असताना, रेल्वे मार्गावर ट्रक आला कसा? यामध्ये कुणाचा हलगर्जीपणा आहे का? याबाबत तपास सुरु आहे.

कांदिवली स्टेशनजवळ सहाव्या लाइनचं काम सुरु होतं. बांद्रा टर्मिनस ते अमृतसर ट्रेन एका ट्रकला धडकली. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. 02925 BDTS-Amritsar ही ट्रेन दुपारी १२.३० च्या सुमारास निघाली. या ट्रेननेच ट्रकला धडक दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2020 3:50 pm

Web Title: train and truck accident near kandivali station no casulty on injury scj 81
Next Stories
1 अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला -संजय राऊत
2 “गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना अडचणी, पण बकरी ईद साजरी करणाऱ्यांना सुविधा,” मनसेची ठाकरे सराकरवर टीका
3 “लॉकडाउन शॉपिंग मॉल्ससाठी मृत्यूची घंटा; ५० लाख रोजगारांवर गदा”
Just Now!
X