News Flash

डहाणू-वलसाड दरम्यान मालगाडीचे ११ डबे घसरले, मुंबई-गुजरात वाहतूक ठप्प

रविवारी रात्री २.३० च्या सुमारास ही घटना घडली.

डहाणू-वलसाड दरम्यान मालगाडीचे ११ डबे घसरले, मुंबई-गुजरात वाहतूक ठप्प
अपघातामुळे मुंबईहून गुजरातच्या दिशेने सुटणाऱया १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

डहाणू-वलसाड रेल्वे स्थानकादरम्यान एका मालगाडीचे ११ डबे रुळावरून खाली घसरल्याने मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली आहे. या अपघातामुळे मुंबईहून गुजरातच्या दिशेने सुटणाऱया १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी रात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली.
फोटो गॅलरी : कसा आणि कुठे झाला अपघात?
दरम्यान, या अपघाताचा लोकल वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. तिनही मार्गांवरील लोकलसेवा सध्या सुरूळीत सुरू आहे.

रद्द झालेल्या गाड्या-

  • १२००९ शताब्दी एक्स्प्रेस
  • १९०११ मुंबई-अहमदाबाद
  • १९२१५ सौराष्ट्र एक्स्प्रेस
  • ०९०२१ वांद्रे-जम्मू तावी
  • १२९३५/१९०५९ बीडीटीएस-एसटी/ जामनगर
  • १२९२२ सुरत-मुंबई सेंट्रल
  • ५९०३८ सुरत-विरार शटल
  • ५९०२४ वलसाड-मुंबई सेंट्रल
  • ५९०४४ डहाणू रोड- विरार

याशिवाय, १६५८७ यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेस या गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, तर १२९३२ डबल डेकर आणि १९०३२ अहमदाबाद-हरिद्वार या दोन गाड्या उशीराने धावत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 7:45 am

Web Title: train derails near dahanu road
Next Stories
1 स्वप्नपूर्तीसाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’
2 विसराळू रेल्वे प्रवाशांच्या प्रमाणात वाढ!
3 गायक अभिजीतची महिला पत्रकाराला शिवीगाळ
Just Now!
X