18 January 2018

News Flash

ढोबळेंच्या ढोबळेगिरीवर वचक

वसंत ढोबळेंची मुंबई मुख्यनियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली सांताक्रूझ येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी दिले होते

मुंबई | Updated: January 12, 2013 1:27 AM

वसंत ढोबळेंची मुंबई मुख्यनियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली
सांताक्रूझ येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी दिले होते आणि कारवाई दरम्यान आपले सामान घेऊन पळणा-या मदन जयस्वाल (४०) या फळविक्रेत्याचा शुक्रवारी सांताक्रूझ येथे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू ओढवला. त्याला व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. जयस्वालच्या मृत्यूनंतर फेरीवाल्यांनी देसाई रुग्णालयाबाहेर ढोबळे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. याची दखल घेत पोलिस आयुक्तालयामार्फत सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांची बदली आता मुंबईच्या मुख्य नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. मदन जयस्वालला पोलिसांनी मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे फेरीवाल्यांचे म्हणणे आहे. मात्र, वसंत ढोबळे यांनी मी कारवाई दरम्यान पोलीस वाहनातचं असल्याचे सांगितले आणि करण्यात आलेले आरोप धांदात खोटे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
  

First Published on January 12, 2013 1:27 am

Web Title: trancefer of acp vasant dhoble
  1. No Comments.