सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलात अंतर्गत बदल्यांचे सत्र सुरू आहे. गुन्हेशाखेतील ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर सोमवारी आयुक्त हेमंत नगराळे यांनी आर्थिक गुन्हे शाखेतील १३ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या.

बदल्या केलेले अधिकारी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते, असे सांगण्यात आले. पोलीस दलाच्या प्रशासकीय विभागाने जारी के लेल्या बदल्यांच्या आदेशात आयुक्त स्तरावरील आस्थापना मंडळाने अपवादात्मक परिस्थितीत आणि प्रशासकीय निकडीनुसार कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या अधिकाऱ्यांची बदली के ल्याचे नमूद के ले आहे. पोलीस निरीक्षक दिलीप देशमुख (विशेष शाखा), जितेंद्र मिसाळ (संरक्षक व सुरक्षा), विनोद भालेराव (विशेष शाखा), बळीराम धस (वाहतूक), कुंडलिक गाढवे (संरक्षण व सुरक्षा), किरण जाधव (दक्षिण प्रादेशिक विभागाचे सायबर पोलीस ठाणे), सहायक निरीक्षक चंद्रशेखर गायकवाड (वाहतूक), विक्रांत शिरसाठ (एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे), संदीप बडगुजर (वडाळा टीटी), दीपक कदम (मानखुर्द), प्रवीण फणसे (भांडुप), महेश तांबे (पंतनगर), धनंजय देवडीकर (शिवाजीनगर) अशी बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.