सलग आठ वर्षे नियुक्तीचा नियम, तीन पसंतीची ठिकाणे मागवली

मुंबई : शहरात सलग आठ वर्षे कार्यरत असलेल्या ७२७ पोलीस अधिकऱ्यांची अन्य जिल्ह्यांत बदली करण्याचा निर्णय महासंचालक कार्यालयाने घेतला आहे. त्यानुसार या अधिकाऱ्यांची यादी मंगळवारी जारी करण्यात आली. या अधिकाऱ्यांकडून जिल्हा बदलीसाठी तीन पसंतीची ठिकाणे कळविण्याचे आदेश देण्यात आले. सर्वसाधारण बदली व्यतिरिक्त एकाच वेळी एकाच घटकातून इतक्या अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेरील बदलीचा हा पहिलाच प्रसंग ठरू शके ल. या बदली प्रक्रियेस अंबानी-मनसुख गुन्ह्यांत अटक झालेले सचिन वाझे यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादाचीही किनार असल्याचे मानले जाते.

मंगळवारी जारी झालेल्या यादीत ८९ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २५३ पोलीस निरीक्षक, ३७५ सहायक निरीक्षक आणि १० उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यातील अनेक वरिष्ठ निरीक्षक, पोलीस निरीक्षकांनी २० ते २५ वर्षे मुंबईतच सेवा बजावली आहे. या निर्णयामुळे मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांची धांदल उडाली. घर, मुलांचे शाळा-महाविद्यालय,

कु टुंबीयांची नोकरी किं वा व्यवसाय मुंबईतच असलेल्या अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेरील बदली सहजशक्य ठरणार नाही. त्यामुळे पोलीस दलात नाराजीचा सूरही आहे.

नियमानुसार आठ वर्षे सलग एकाच जिल्ह्यात, एकाच घटकात सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली के ली जाते. मुंबई पोलीस आयुक्तालय मात्र या नियमास आतापर्यंत अपवाद ठरत होते. लोकसंख्या, गुन्हेगारीचे स्वरूप, दहशतवादी हल्ल्याची टांगती तलवार अशा विविध कारणांमुळे शहराची ओळख असलेल्या अनुभवी अधिकाऱ्यांना शहरातच थांबवून ठेवण्याचा प्रघात होता, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.