News Flash

अन्न व औषध प्रशासन आयुक्तांची उचलबांगडी

रेमडेसिविरचा तुटवडा भोवला; मंत्रिमंडळाच्या बैठकीत तक्रार

(संग्रहित छायाचित्र)

रेमडेसिविरचा राज्यात तुटवडा जाणवत असताना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी काहीच हालचाल के ली नाही, अशी तक्रार अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी केल्यावर काळे यांची  पदावरून उचलबांगडी करण्यात आली.

रेमडेसिविर आणि प्राणवायूच्या तुटवड्यावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  चर्चा झाली. गुजरातमधील एका कंपनीने राज्याला दीड लाखांचा रेमडेसिविरचा साठा देण्याचे कबूल केले होते. पण सूचना करूनही अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दोन दिवस पत्रच दिले नाही, अशी तक्रार जितेंद्र आव्हाड यांनी केली.  मुंबई महानगरपालिका आयुक्त  चहल यांनी दोन लाख रेमडेसिविरचा साठा मिळविला. राज्य सरकारला हे का जमले नाही, असा सवाल काही मंत्र्यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना केला. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त काळे हे रेमडेसिविरचा साठा मिळविण्यासाठी फारसे प्रयत्नशील नव्हते, असाही मंत्र्यांचा सूर होता. केंद्राने रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातल्यावर या इंजेक्शनचा साठा असलेल्या कं पन्यांशी काळे यांनी संपर्क साधणे आवश्यक होते. पण राज्य सरकार त्यात कमी पडल्याची भावना मंत्र्यांनी व्यक्त केली.

अन्न व औषध प्रशासन खात्याच्या कारभाराबद्दल असलेल्या नाराजीमुळेच राज्य सरकारने अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त काळे यांची तात्काळ उचलबांगडी केली. परिमल सिंग यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.

गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या वेळी सरकारी मदत वाटल्याच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने काळे यांची तेव्हा गोंदिया जिल्हाधिकारी पदावरून उचलबांगडी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 1:02 am

Web Title: transfer of food and drug administration commissioner abn 97
Next Stories
1 ‘शिंगणे यांच्या स्पष्टीकरणामुळे सरकारची कोंडी’
2 न्यायालये जामिनास नकार देत असल्यानेच कारागृहांमध्ये करोना!
3 अकरावीसाठी यंदा प्रवेश परीक्षा?
Just Now!
X