प्रवीण दराडे यांची समाजकल्याण आयुक्तपदी बदली

मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच एकाच वेळी २२ अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
Morbi bridge
१३५ जणांचा जीव घेणाऱ्या मोरबी पूल दुर्घटनेतील आरोपीला अखेर जामीन, पण कोर्टाने घातल्या ‘या’ अटी

माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे महासंचालक म्हणून कार्यरत असलेले ब्रिजेश सिंह यांच्या जागी डी.डी. पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिजेश सिंह हे आयपीएस अधिकारी आहेत.

त्याचबरोबर राजीव जलोटा, संजीव कुमार, असिम गुप्ता, बी. वेणुगोपाल रेड्डी, डॉ. के.एच. गोविंदराज आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रवीण दराडे हे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जात होते. मुख्यमंत्री कार्यालय, एमएमआरडीए, मुंबई महापालिका अशा मोक्याच्या ठिकाणी त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. त्यांची आता समाजकल्याण आयुक्त म्हणून पुणे येथे बदली करण्यात आली आहे.

राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या व्यवस्थापैकीय संचालक जे मुखर्जी यांची मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  या विभागातील प्रधान सचिव एस. ए .तागडे यांची बदली वस्त्रोद्योग विभागात प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची नियुक्ती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापैकीय संचालक बी. वेणुगोपाल रेड्डी यांची नियुक्ती वन विभागाच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे.

ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांची ऊर्जा विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. विक्रीकर आयुक्त राजीव जलोटा यांची ग्रामविकास विभाच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

इतर बदल्या

  •  संजीव कुमार (आयुक्त विक्रीकर महाराष्ट्र राज्य मुंबई ),  पी. वेलरासू (अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका),
  • श्रीमती शैला ए. (अध्यक्ष व व्यवस्थापैकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी, मुंबई), श्वेता सिंघल (अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे)
  •   शेखर सिंग (जिल्हाधिकारी सातारा), दीपक सिंगला (जिल्हाधिकारी, गडचिरोली), मंजू लक्ष्मी (जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग), आर. बी. भोसल (सहव्यवस्थापैकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी), नयना गुंडे (आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे)
  • मिलिंद शंभरकर (जिल्हाधिकारी ,सोलापूर), डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी (अध्यक्ष व व्यवस्थापैकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे),
  • आर. एस. जगताप (अतिरिक्त विभागीय आयुक्त नागपूर),  भुवनेश्वरी ( मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा) मदन नागरगोजे (संचालक, माहिती व तंत्रज्ञान मुंबई)