News Flash

मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्तांच्या बुधवारी खात्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

| February 14, 2013 04:28 am

दिघावकर वाहतूक, किशोर जाधव अंमली पदार्थविरोधी शाखेत
मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्तांच्या बुधवारी खात्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दोर्जे यांची नियुक्त करण्यात आली आहे. परिमंडळ १० च्या ठिकाणी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांना नेमण्यात आले आहे. अंमलबजावणी खात्याचे पोलीस उपायुक्त बी. जी. शेखर यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली असून परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त किशोर जाधव यांची अंमली पदार्थविरोधी शाखेत बदली करण्यात आली आहे.
सत्यनारायण चौधरी यांना क्राइम ब्रांच १ तसेच अंमलबजावणी शाखेचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. अंबादास पोटे यांना क्राइम ब्रँच २ आणि अंमली पदार्थविरोधी शाखेचे उपायुक्त विनायक देशमुख यांच्याकडे परिमंडळ ३ ची जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 4:28 am

Web Title: transfer of mumbai police deputy commissioner
टॅग : Transfer
Next Stories
1 खुनी मातेच्या जन्मठेपेवर शिक्कामोर्तब
2 मोटारसायकलीने तरुणीचे मनगट तोडले
3 तरुणीच्या गाडीची पोलिसाला धडक
Just Now!
X