News Flash

राज्यातील काही ‘आयएएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारचा निर्णय. पाच आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश

(संग्रहित छायाचित्र)

राज्य सराकारने काही ‘आयएएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यामध्ये डॉ. निधी पांडे, व्ही.एन.कळम, आर.व्ही.निंबाळकर, सी.के.डांगे, सुशील खोडवेकर या ‘आयएएस’ अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.

डॉ. निधी पांडे यांची शिवशाही पुर्नविकास प्रकल्प मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. व्ही.एन.कळम यांची विकास आयुक्त (असंघटीत कामगार) मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. तर पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आर.व्ही. निंबाळकर यांची झोपडपट्टी पुनर्वसन विकास, पुणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली गेली आहे. सी.के.डांगे यांची मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या संयुक्त सचिवपदी नियुक्ती झाली आहे. तर सुशील खोडवेकर यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय येथील उप सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 7:31 pm

Web Title: transfers of some ias officers in the state msr 87
Next Stories
1 मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; मुलुंड स्थानकात शॉर्ट सर्किट
2 बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी वर्णी
3 मुंबईत झाड कोसळून दोघांचा मृ्त्यू
Just Now!
X