राज्यात सध्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू असतानाच, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या बदल्यांच्या अधिकारांना कात्री लावण्यात आली आहे. मंत्र्यांकडील बदल्यांचे बहुतांश अधिकार विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहेत. तसा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागात ५० टक्के अधिकारी व कर्मचारी महसूल विभागातील असतात. त्यांच्या बदल्यांचे, बढत्यांचे अधिकार महसूल विभागाला असतात. उर्वरित स्वत:च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार अन्न व नागरी पुरवठा विभागाला आहेत.