News Flash

दुभाषकाने माजी इराकी सैनिकाला लुटले

एका माजी इराकी सैनिकाला लुबाडणाऱ्या दुभाषकाला कुलाबा पोलिसांनी घाटकोपर येथून अटक केली आहे. डोळ्यांच्या उपचारांसाठी मुंबईत इराकी सैनिक आला होता.

| September 1, 2014 01:30 am

एका माजी इराकी सैनिकाला लुबाडणाऱ्या दुभाषकाला कुलाबा पोलिसांनी घाटकोपर येथून अटक केली आहे. डोळ्यांच्या उपचारांसाठी मुंबईत इराकी सैनिक आला होता.
अब्बास इब्राहिम (५९) हे इराक सैन्यातून निवृत्त झाले आहेत.  कुलाबा येथील गल्फ हॉटेलमध्ये ते उतरले होते. त्यांना मुंबईत दैनंदिन व्यवहार करण्यासाठी एका दुभाषकाची गरज होती. त्यावळी त्यांची हॉटेलच्या परिसरात मकसूद शेख (६३) याच्याशी ओळख झाली. पत्रकार असणाऱ्या मकसूदला हिंदी आणि मराठीव्यतिरिक्त अरबी भाषा येत होती.  इब्राहिम यांच्यावर पुढील उपचारांसाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात जायचे होते. त्यावेळी शेखने त्यांच्या पाकिटातील ८०० डॉलर घेऊन पोबारा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 1:30 am

Web Title: translator cheats ex iraqi army personnel
Next Stories
1 शिक्षक-विद्यार्थ्यांशी संवादाआधीच वाद
2 दुर्मीळ कलाकृती जतनाचे आव्हान
3 सणासुदीची ‘गोडी’ वाढली!
Just Now!
X