News Flash

आषाढी एकादशीला दहा पालख्यांचा एसटीतून प्रवास

वारी सोहळ्यावर यंदाही करोनाचे सावट कायम आहे.

मुंबई: आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही करोनाचे सावट कायम आहे. करोनाचे संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील दहा पालख्यांसाठी एसटीची लालपरी धावणार आहे.

करोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० प्रमुख पालख्या एसटीच्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. १९ जुलै रोजी एसटीच्या गाड्या पालख्यांसह पंढरपूरकडे रवाना होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 12:00 am

Web Title: travel through st ashadi ekadashi akp 94
Next Stories
1 “…तर लोक जोड्यानं मारतील”, स्वबळाच्या नाऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला सुनावलं!
2 लसीकरण घोटाळा : नागरिकांना आवाहन करत आदित्य ठाकरे म्हणाले…
3 “आम्हाला एकटं लढू द्या, मग बघा”, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांचा इशारा!
Just Now!
X