01 October 2020

News Flash

करोना रुग्णांसाठी सेंट जॉर्ज ,जीटी रुग्णालयात उपचार

५४२ खाटा, १२० आयसीयू, १४ डायलिसिस मिशन आणि ७० व्हेंटिलेटर

संग्रहित छायाचित्र

संदीप आचार्य

मुंबईत करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असताना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागानेही सेंट जॉर्ज व जीटी रुग्णालयातील करोना सुविधा वेगाने वाढवायला सुरुवात केली आहे. या दोन्ही रुग्णालयात येत्या आठवडा अखेरीस तीनशे नवीन खाटा, व्हेंटिलेटर, आयसीयू खाटा तसेच अतिरिक्त डायलिसिस मशीन सुरू झालेली असतील, असे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

मुंबईत आजघडीला करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी अपुऱ्या खाटा असून मुंबई महापालिका साडेतीन हजार खाटांची व्यवस्था पालिकेच्या नायर, केईएम, शीव तसेच अन्य रुग्णालयात करत असून खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून आणखी किमान साडेतीन हजार बेड उपलब्ध होतील, असे करोनाच्या लढाईसाठी पालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या आदेशामुळे मुंबईतील तसेच राज्यातील खाजगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी करोनाच्या रुग्णांची तसेच गंभीर रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे अधिक अतिदक्षता विभागात खाटांची गरज निर्माण झाली आहे.

या पाश्र्वभूमीवर सेंट जॉर्ज व जीटी रुग्णालयात आठवडा अखेरीस ५४२ खाटा करोना रुग्णांसाठी तयार असतील असे डॉ. लहाने यांनी सांगितले. सध्या जीटी रुग्णालयात १२९ खाटा तर सेंट जॉर्ज रुग्णालयात १२२ खाटा असून गुरुवार पर्यंत  दोन्ही रुग्णालयात मिळून ५४२ खाटा तयार असतील तसेच अतिदक्षता विभागात १२० खाटा असतील, असे डॉ. लहाने म्हणाले.  सेंट जॉर्जमध्ये ७० व्हेंटिलेटर व १४ डायलिसिस मशीन बसविण्यात आली आहेत. सध्या जीटी रुग्णालयात ११२ रुग्ण दाखल आहेत तर सेंट जॉर्जमध्ये १२९ करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आता येत्या आठवडय़ापासून दुपटीहून अधिक रुग्णांना दाखल करून उपचार करता येईल,  असे त्यांनी सांगितले.

राज्यात करोनाचे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांची संख्या ९९३ एवढी आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याने अतिदक्षता विभागात जास्तीतजास्त खाटा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 12:56 am

Web Title: treatment at st george gt hospital for corona patients abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनावर मात करून १९१ पोलीस सेवेत
2 नियमभंग झाल्यास सोसायटी पदाधिकाऱ्यांना शिक्षा
3 करोनाविरूद्धच्या लढाईत मंत्रालयातील दीड हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज
Just Now!
X