27 November 2020

News Flash

वृक्ष प्राधिकरण सदस्यांना गुजरात दौऱ्याचे वेध

मुंबईत अपयशी ठरणाऱ्या विदेशी तंत्रज्ञानामुळे पालिकेच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचा अनुभव असतानाही अमेरिकेतील तंत्रज्ञानाच्या साहाय्याने

| September 7, 2013 05:22 am

मुंबईत अपयशी ठरणाऱ्या विदेशी तंत्रज्ञानामुळे पालिकेच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचा अनुभव असतानाही अमेरिकेतील तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वृक्षांचे पुनरेपण पाहण्यासाठी गुजरातमध्ये जाण्याची तीव्र इच्छा वृक्ष प्राधिकरणाचे सदस्यांना झाली आहे. लवकरच पालिका अधिकारी आणि वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. विकासकामांच्या आड येणाऱ्या वृक्षांचे पुनरेपण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र पुनरेपणासाठी वृक्ष सुरक्षित पद्धतीने मूळ ठिकाणाहून हलविण्याचे तंत्रज्ञान पालिकेकडे नाही. झाडालगतची माती खणून वृक्ष अन्यत्र हलविला जातो. मात्र त्यावेळी वृक्षांची मुळे दुखावतात आणि पुनरेपणानंतर ती दगावतात. सध्या गुजरातमध्ये अमेरिकेतील यंत्राच्या मदतीने वृक्षांचे पुनरेपण करण्यात येत आहे. या यंत्रामुळे वृक्ष सहजगत्या दुसऱ्या ठिकाणी नेता येतो. हे यंत्र पाहण्यासाठी गुजरातला जाण्याचा आग्रह वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांनी धरला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 5:22 am

Web Title: tree authority members aims to visit gujarat
Next Stories
1 विशेष महिला कक्षात निम्म्याहून अधिक पदे रिक्त
2 नावातच ‘राव’ आहे..
3 ‘महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी गणेश मंडळांची’- सत्यपाल सिंह
Just Now!
X