News Flash

वाकोल्यात झाड कोसळून चौघांचा मृत्यू, पाच जखमी

वाकोला येथील पाइपलाइन परिसरात झाड कोसळून झालेल्या घटनेत ४ जण ठार आणि ५ जण जखमी झाले.

| July 27, 2015 12:03 pm

वाकोला येथील पाइपलाइन परिसरात झाड कोसळून झालेल्या घटनेत ४ जण ठार आणि ५ जण जखमी झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली.
सांताक्रूझमधील वाकोला येथे मध्यरात्री भिंतीच्यालगत असलेले एक झाड कोसळल्यामुळे भिंत पडली. भिंत बाजूच्या घरावर कोसळल्याने त्यात नऊजण अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी या नऊजणांना बाहेर काढले. पण, यातील चारजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पाचजणांवर व्ही.एन देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 12:03 pm

Web Title: tree collapse in vakola four dead five injured
टॅग : Wall Collapse
Next Stories
1 मुंबईतील टोलबाबत संदिग्धता
2 तर विकासकाला डच्चू
3 मुंबईत दोन दिवस पावसाचे?
Just Now!
X