तत्कालीन नगरसेवकांची सहमती असलेला प्रस्ताव शिवसेनेने रोखला

कुर्ला, पवई परिसरातील तुंगा व पासपोली परिसरात आपले कार्यालय उभारण्यासाठी अनधिकृतपणे वृक्षांची कत्तल करणाऱ्या एल अ‍ॅण्ड टी कंपनीला तेथील १९२ वृक्षांचे पुनरेपण आणि ८३ वृक्षांची कत्तल करण्यास परवानगी देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. तर शिवसेनेच्या तत्कालीन नगरसेवकांनी पाहणी करून त्यास सहमती दर्शविली होती. मात्र मेट्रोच्या निमित्ताने वृक्षतोडीला विरोध दर्शविणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा तुंगा व पासपोली परिसराची पाहणी करण्याची मागणी करीत हा प्रस्ताव रोखून धरला.

pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

एल अ‍ॅण्ड टी कंपनीने तुंगा, पासपोली गावामध्ये कार्यालयासाठी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील ३७९ पैकी १९२ वृक्षांचे पुनरेपण, तर ८३ वृक्षांची कत्तल करण्यास परवानगी मिळावी यासाठी कंपनीने पालिकेला प्रस्ताव सादर केला आहे. गेल्या वर्षी कंपनीने प्रस्ताव सादर केल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी तुंगा, पासपोली गावात पाहणी केली होती. त्या वेळी परवानगी घेण्यापूर्वीच काही वृक्ष तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पालिकेने एल अ‍ॅण्ड टी कंपनीच्या कंत्राटदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कंपनीनेही आपली चूक मान्य केली होती. त्यानंतर पालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानुसार तत्कालीन सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ, शिवसेनेचे रमेश कोरगावकर, मनसेच्या अनिषा माजगावकर यांनी २६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहणी केली होती. पाहणीनंतर त्यांनी प्रस्तावास सहमती दर्शविली होती.

वृक्ष प्राधिकरणाच्या बुधवारच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर सभागृहनेते यशवंत जाधव यांनी त्यास विरोध केला. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच या प्रस्तावाचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. एल अ‍ॅण्ड टी कंपनीच्या नव्या कार्यालय उभारणीमुळे रोजगारनिर्मिती होऊ शकेल. तसेच तत्कालीन नगरसेवकांनी पाहणी करून सहमती दर्शविली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यास हरकत नाही, अशी आग्रही भूमिका वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष असलेले पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतली होती. परंतु सत्ताधारी शिवसेना तुंगा, पासपोली गावाची पाहणी केल्यानंतरच प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यावर ठाम राहिली. अखेर हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला.