News Flash

थडोमल सहानीमध्ये ‘ट्रिफ्लेस २०१५’ची धूम

थडोमल सहानी अभियांत्रिकी महाविद्यालयात १९ ते २१ मार्च या कालावधीत ‘ट्रिफ्लेस २०१५’ या वार्षिक महोत्सवाची धूम रंगणार आहे.

| March 18, 2015 12:15 pm

थडोमल सहानी अभियांत्रिकी महाविद्यालयात १९ ते २१ मार्च या कालावधीत ‘ट्रिफ्लेस २०१५’ या वार्षिक महोत्सवाची धूम रंगणार आहे. सेलिब्रिटींचे कार्यक्रम हे यंदा या महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहेत.
माणसाला आनंद देणाऱ्या गाणी, विनोद, वाचन, नाच अशा विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा मेळ या महोत्सवात असतो म्हणून याला ‘ट्रिफ्लेस’ असे नाव देण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचे १४वे वर्ष आहे. यंदा हा महोत्सव महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगणार असून १९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गायिका सोना मोहापात्रा हिचा कार्यक्रम होणार आहे, तर २० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता ईडीएम कलाकार न्यूक्लेयाचा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी १४ वैयक्तिक अल्बम असलेले युटय़ूबवरील ‘द वायरल फिव्हर (टीव्हीएफ)’चे कलाकार कार्यक्रम सादर करणार आहे. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता होणार आहे. या महोत्सवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 12:15 pm

Web Title: trifles 2015 of shahani engineering college held between 19 to 21 march
Next Stories
1 मेट्रो-३ विरोधात गिरगावकरांचा एल्गार
2 पानसरे हत्येच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांची पोलिसांना मुदत!
3 पूर्वेचे वारे ओसरल्याने मुंबईत पुन्हा गारवा
Just Now!
X