05 December 2020

News Flash

टीआरपी प्रकरणात प्रमुख आरोपीला अटक

सर्वच वाहिन्यांशी संपर्क

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

सर्वच वाहिन्यांशी संपर्क

मुंबई : टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अभिषेक कोळवडे याला रविवारी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अटक के ली. घोटाळ्यात सहभागी सर्वच वाहिन्यांसाठी अभिषेक याने गुन्हे, अवैध कामे के ल्याचा दावा गुन्हे शाखेने के ला.

तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अभिषेकने वकिलामार्फत रविवारी दुपारी गुन्हे शाखेच्या विशेष पथकासमोर शरणागती पत्करली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला दंडाधिकारी न्यायालयात हजर के ले जाईल.

आतापर्यंत अटक झालेल्यांपैकी चार ते पाच आरोपींनी चौकशीदरमयान अभिषेकचे नाव घेतले. ग्राहकांना फितवून, पैशांचे आमिष दाखवून कृ त्रिमरीत्या टीआरपी वाढवून घेतलेल्या बहुतांश वाहिन्यांचे पदाधिकारी अभिषेकच्या संपर्कात होते. वाहिन्या अभिषेकला पैसे देत. अभिषेत त्यातली रक्कम ग्राहकांना फितवणाऱ्या सहकाऱ्यांना वाटे. या आर्थिक व्यवहारांसह अभिषेकने वाहिन्यांसाठी विविध प्रकारची अवैध कामे के ल्याचा संशय गुन्हे शाखेने वर्तवला.

सुरुवातीपासून विशेष पथक अभिषेकचा शोध घेत होते. मात्र रहस्यमयरीत्या वावरणाऱ्या अभिषेकपर्यंत पोहोचण्यात पथकाला अनेक अडचणी येत होत्या. अटक आरोपींपैकी कोणालाच त्याचे खरे नाव, ठावठिकाणा किं वा संपर्क क्र मांक याबाबत काहीच ठाऊक नव्हते. प्रत्येकाला तो अमीत, अजित, महाडिक अशी खोटी ओळख सांगे. चार ते पाच वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या नावे त्याने सीमकार्ड विकत घेतले होते.

गुन्हे शाखेने शनिवारी रिपब्लिक, न्यूज नेशन आणि महामूव्हीज वाहिन्यांच्या चालक किं वा मालक आणि संबंधीत व्यक्तींचा घोटाळ्यातील सहभाग स्पष्ट झाला. हे सर्व वॉण्टेड आरोपी असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. अभिषेकच्या अटके ने घोटाळ्यात सहभागी वाहिन्यांच्या प्रतिनिधींबाबत नेमकी माहिती मिळू शके ल, असा दावा अन्य अधिकाऱ्यांनी के ला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 2:24 am

Web Title: trp scam main accused arrested by crime branch zws 70
Next Stories
1 मुंबईत वाहन खरेदीत वाढ
2 सोने खरेदीत घट
3 पोलीस सुरक्षा नियम कागदावरच!
Just Now!
X