News Flash

विक्रोळीत भरधाव ट्रक उलटला, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चौघांचा मृत्यू

ट्रकखाली सापडून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर झाला आहे.

पाचही जण जेवणानंतर रस्त्याच्या कडेला गप्पा मारत थांबले होते. (छायाचित्र सौजन्य: न्यूज १८ लोकमत)

विक्रोळीतील पार्क साईट परिसरात धान्याने भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली. या ट्रकखाली सापडून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर झाला आहे.

धान्याने भरलेला ट्रक शुक्रवारी विक्रोळी पार्कसाईट परिसरातून जात होता. यादरम्यान ट्रकचे मागील चाक गटारात अडकले आणि ट्रक उलटला. या ट्रकखाली सापडून चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हे पाचही जण जेवणानंतर रस्त्याच्या कडेला गप्पा मारत थांबले होते.

दरम्यान,  विक्रोळी पार्कसाईट परिसरात नुकतेच गटाराचे काम झाले होते. या गटारावर झाकणही टाकण्यात आले होते.  मात्र हे काम नित्कृष्टदर्जाचे असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 8:01 am

Web Title: truck accident at vikhroli 4 killed one injured
Next Stories
1 औद्योगिक ग्राहकांसाठी ऊर्जा विभागाची धडपड
2 अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या  ठाण्यातील रुग्णालयांना टाळे ठोका! – न्यायालय
3 बेकायदा बांधकामांमध्ये देव राहतो तरी कसा?
Just Now!
X