News Flash

मुंबईत विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर ट्रक उलटला

ट्रकची टाकी फुटल्याने डिझेल रस्त्यावर सांडले, हा ट्रक हटवण्याचे काम सुरू

आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर पवई या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर ट्रक उलटला. या अपघातात ट्रक चालक आणि त्याच्या सहकाऱ्याचा जीव थोडक्यात वाचला. ट्रकची टाकी फुटल्याने डिझेल रस्त्यावर सांडले मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रक उलटल्याने वाहतुकीत बदल करणअयात आला आहे. पवई आयआयटी गेटपासून हा बदल करण्यात आला असून वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. ट्रक सामानानी भरलेला असल्याने तो रस्त्यावरून बाजूला काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली आहे अशीही माहिती मिळते आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 7:34 am

Web Title: truck accident on vikroli jogeshwari link road mumbai
Next Stories
1 ५६ इंची छातीचा दावा करणारे, कमर बाजवांचा बाजा वाजवणार का?-शिवसेना
2 ‘मुंबईचा राजा’ बनण्याची संधी!
3 जिवावर उदार होऊन रुळांवर!
Just Now!
X