X
X

जोगेश्वरीत ट्रकची दुचाकीला धडक, 20 फुटापर्यंत फरफटत नेल्याने पतीचा मृत्यू; पत्नी जखमी

अपघातानंतर लोकांनी ट्रक ड्रायव्हरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं

पश्चिम द्रुतगती मार्गावर ट्रकने मागून दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विश्वास मध्यालकर पत्नीसोबत दुचाकीवरुन जात असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या भीषण अपघातात विश्वास मध्यालकर यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. जोगेश्वरीजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विश्वास मध्यालकर पत्नीसोबत दुचाकीवरुन जात होते. जोगेश्वरी उड्डाणपुलाजवळ असताना एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जबर होती की, विश्वास यांच्या पत्नी दूरवर फेकल्या गेल्या.

ट्रकने विश्वास यांनी जवळपास 20 फुटांपर्यंत फरफटत नेलं. ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी गंभीर जखमी असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर लोकांनी ट्रक ड्रायव्हरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

20
First Published on: February 19, 2019 9:34 am
Just Now!
X