19 September 2020

News Flash

अण्णांच्या मागण्या मान्य न झाल्यास खळखट्याक; तृप्ती देसाईंचा सरकारला इशारा

बॉलिवूडच्या कलाकारांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटोसेशन करण्यासाठी मोदींकडे वेळ असतो मात्र, अण्णांशी चर्चेला त्यांच्याकडे वेळ नाही.

लोकपाल आणि लोकायुक्तांच्या त्वरीत नियुक्तीसाठी गेल्या ७ दिवसांपासून उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पाठींबा दर्शवला आहे. तसेच अण्णांच्या मागण्या योग्य असून त्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा संघटनेच्यावतीने रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल तसेच प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्याही फोडण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या, अण्णांचे उपोषण हे सर्वसामान्यांसाठी आहे. लोकांसाठी अण्णांना वारंवार उपोषणाला बसावं लागतं. अण्णा उपोषणाला बसल्यानंतर सहा दिवसांपर्यंत उपोषण सुटत नाही म्हणजे काय? यावरुन हे सरकार गेंड्याच्या कातडीचे असल्याचं सिद्ध होतं. अण्णांचं वय पाहता मुख्यमंत्र्यांनी निरोप पाठवण्याऐवजी स्वतः निर्णय घेऊन इथं येणं अपेक्षित होतं. अण्णांच्या उपोषणाबाबत अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलत नाहीत. मोदींनी सांगितलं होत की, ते सर्वांसाठी अच्छे दिन आणतायत हेच त्यांचे अच्छे दिन आहेत का? असा सवालही तृप्ती देसाई यांनी केला.

बॉलिवूडच्या कलाकारांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटोसेशन करण्यासाठी मोदींकडे वेळ आहे. मात्र, अण्णांनी चर्चेला एक वाक्य बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही? अस असेल तर तुमच्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. आपण तातडीने या मागण्या मान्य कराव्यात नाहीतर आमच्यासारख्या महिला संघटना देखील आक्रमकपणे रस्त्यावर उतरतील आणि मग यांना धडा शिकवू, असा इशारा देसाई यांनी सरकारला दिला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, केंद्राकडून अण्णांना तोडग्याबाबत निरोप आला आहे. त्यावर कारवाईसाठी दोन दिवसांचा अवधी आहे. मात्र, ९ फेब्रुवारीपर्यंत जर अण्णांचं उपोषण सुटलं नाही तर मंत्र्यांच्या गाड्या फोडायला आमच्या महिला रस्त्यावर असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 8:21 am

Web Title: trupti desais support for anna hazares fast
Next Stories
1 पश्चिम बंगालमधील राजकीय युद्ध ही अराजकतेची ठिणगी: शिवसेना
2 संक्रमण शिबिरांतील रहिवाशांना हक्काचे घर
3 ओला-उबर सेवा बेकायदा!
Just Now!
X