24 January 2021

News Flash

मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे  हे गेल्या ऑगस्टपासून  नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यापासून गेले पाच महिने नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तुकाराम मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय अन्य चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

तुकाराम मुंढे  हे गेल्या ऑगस्टपासून  नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. प्रशासकीत वर्तुळात मानवी हक्क आयोगातील नेमणूक ही तुलनेत दुय्यम दर्जाची मानली जाते.

मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आणि गेल्या काही महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अप्पर मुख्य सचिव अरविंद कु मार यांची सहकार विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

याशिवाय डी.बी. गावडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागात सहसचिवपदी तर उदय जाधव यांची राज्य बालहक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुत्ती करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 12:21 am

Web Title: tukaram mundhe as the secretary of the human rights commission abn 97
Next Stories
1 स्वयंअर्थसाहाय्यित कौशल्य विद्यापीठ स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता
2 ‘नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह’ प्रकाशित
3 भागधारकांना दिलासा
Just Now!
X