रेडिओ कॉलर लावलेल्या बिबटय़ांच्या प्रवासातील निरीक्षणे

मुंबई : माणसाने आखलेल्या सीमारेषा बिनदिक्कत ओलांडत एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात खुशाल बागडणाऱ्या बिबटय़ांच्या प्रवासाची निरीक्षणे ‘रेडिओ कॉलर’ अभ्यासातून समोर आली आहेत. ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील ‘महाराजा’ बिबटय़ाने ३ वेळा तुंगारेश्वर अभयारण्याची सफर केली, तर सावित्री बिबटय़ाने तुळशी तलावाला प्रदक्षिणा घातल्याचे उघडकीस आले आहे.

प्राण्यांची मानसिकता समजून घेऊन मानव-प्राणी संघर्ष टाळण्याच्या हेतूने शहरी भागातील जंगलांतील प्राण्यांचा वावर कसा असतो याचा अभ्यास करण्यासाठी बिबटय़ांना ‘रेडिओ कॉलर’ लावून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. गेल्याच महिन्याला ‘सावित्री’ या मादी बिबटय़ाला आणि ‘महाराजा’ या नर बिबटय़ाला कॉलर लावण्यात आली. तीन वर्षांच्या सावित्रीने १७ मार्चला संध्याकाळी ७.३० वाजता चालायला सुरुवात के ली. ११ तासांमध्ये तिने तुळशी तलावाची ४.५७ किमीची परिक्रमा पूर्ण के ली. मधल्या काळात तिने एका कु त्र्याच्या पिल्लाची शिकार केल्याचे अवशेष सापडले. चौकशी केली असता पिल्लू हरवल्याचे त्याच्या मालकाने सांगितले. त्यामुळे सावित्रीने शिकार के ल्याची खात्री पटली.

वसई खाडीच्या पलीकडील नागला भागात ६ ते ८ वर्षांच्या महाराजाचा अधिवास आहे. कॉलर बसवल्यानंतर त्याने ३ वेळा तुंगारेश्वरच्या अभयारण्यात फे री मारली. ६ दिवसांत ६२ किमी अंतर पार के ले. यापैकी ८ कि.मी. अंतर दिवसांत, तर ५४ कि.मी. अंतर रात्रीच्या वेळी पार के ले. त्याने तेथे सात दिवस मुक्कामही के ला आहे. यादरम्यान महाराजाने चिंचोटी-भिवंडी महामार्ग आणि रेल्वेमार्ग ओलांडला. महाराजाने एका मादी वाघिणीसोबत प्रवास के ल्याचे सापडलेल्या ठशांवरून कळते. तसेच महाराजाने शिकार के लेल्या कोंबडय़ांची पिसेदेखील सापडली आहेत.

सावित्रीची कॉलर कृत्रिम उपग्रहावर (सॅटेलाइट) आधारित आहे. महाराजाची ‘जीएसएम कॉलर’आहे. या कॉलरमध्ये असलेल्या सिमकार्डमधील संदेश (सिग्नल) थेट संगणकावरील सिमकार्डला मिळतो. ६ हजार नोंदी (रीडिंग्ज) देण्याची रेडिओ कॉलरची क्षमता आहे. त्यानंतर कॉलर बिबळ्याच्या गळ्यातून गळून पडते. बिबळ्या नेमके  कोणत्या परिघात भ्रमण करतात, कु ठे अधिक काळ घालवतात, इत्यादी माहिती मिळते. मिळालेल्या नोंदींच्या आधारे संबंधित ठिकाणी जाऊन अभ्यास के ला जातो. बिबळ्या जिथे आराम करतात त्या ठिकाणी त्यांचे के स पडलेले आढळतात किं वा गवत खाल्लेले दिसते. एखादी शिकार के ली असल्यास त्या ठिकाणी भक्ष्याचे अवशेष सापडतात.

संघर्ष टाळण्यासाठी..

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्य ही दोन्ही जंगले मानवी वस्तीने वेढलेली आहेत. अनेकदा या जंगलांतील बिबटय़ांविषयी नागरिकांच्या मनात दहशत असते. काही वेळा मानवी वस्तीच्या जवळपास बिबटय़ांच्या पावलांचे ठसे सापडतात; मात्र बिबटय़ा येऊन गेल्याचे रहिवाशांना माहीत नसते. बिबटय़ा विनाकारण माणसांवर हल्ला करत नाही. रहिवासी आजतागायत बिबटय़ांच्या सहवासात राहात आले आहेत. त्यांनी यापुढेही अशाच प्रकारे बिबटय़ांसह दैनंदिन आयुष्य जगावे, विनाकारण संघर्ष निर्माण करू नये यासाठी या प्रकल्पाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.