20 September 2020

News Flash

तुभ्रे येथे कडकडीत बंद

तुर्भे स्टोअर येथील हनुमाननगर भागातील एका नऊ वर्षीय मुलीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याने मंगळवारी त्या मुलीचा मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ बुधवारी या भागात

| June 27, 2013 03:31 am

तुर्भे स्टोअर येथील हनुमाननगर भागातील एका नऊ वर्षीय मुलीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याने मंगळवारी त्या मुलीचा मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ बुधवारी या भागात बंद पाळण्यात आला. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी पीडित मुलीच्या आईवडिलांनी केली आहे.
या मुलीच्या आईवडिलांनाही आठ दिवस त्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे माहीत नव्हते. मुलीला त्रास होत असल्याने त्यांनी तिला पालिका रुग्णालयात दाखल केले होते. तेथे ती पडल्याचे सांगण्यात आले होते. त्या मुलीच्या मैत्रिणींनी ही बाब रुग्णालयात तिला भेटायला आल्यानंतर सांगितली. वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात या मुलीने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने तिला नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात हलविण्यात आल़े  तेथे  तिचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यामुळे येथे बंद पाळण्यात आला होता. या घटनेतील चार आरोपींची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तुर्भे स्टोअरच्या पूर्व बाजूस असणाऱ्या डोंगराच्या कडेला या मुलीला नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला होता. या गुन्ह्य़ातील आरोपी १३ ते १६ वयोगटातील असली तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 3:31 am

Web Title: turbhe close against rape
Next Stories
1 मुंबई तापाने त्रस्त
2 शीतल म्हात्रेंच्या निलंबनाचे संकेत
3 गुटखा परत मिळविण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली
Just Now!
X