News Flash

वेब कॅमेरा सुरू करा, तेव्हाच परीक्षा द्या!

अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शिकाऊ लायसन्ससाठी परिवहन विभागाच्या संके तस्थळावर जाऊन अर्ज करताना बरीच माहिती भरावी लागते.

घरबसल्या शिकाऊ लायसन्स परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी लवकरच नवीन नियम

मुंबई : घरबसल्या शिकाऊ लायसन्सची (अनुज्ञप्ती) ऑनलाइन परीक्षा देताना गैरप्रकार होत असल्याने त्याला रोखण्यासाठी आता वेब-कॅ मेरा सुरू ठेवणे बंधनकारक करण्याचा विचार करण्यात येत आहे. वेब कॅ मेरा असेल तरच अशाप्रकारे परीक्षा देता येणार आहे. अन्यथा परीक्षा देता येणार नाही, असा नियम करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शिकाऊ लायसन्ससाठी परिवहन विभागाच्या संके तस्थळावर जाऊन अर्ज करताना बरीच माहिती भरावी लागते. ऑनलाइन अर्ज के ल्यानंतर आरटीओकडून उपलब्ध सत्रानुसार वेळ दिली जाते. कधीकधी या परीक्षेची तारीख लवकरच मिळते, नाहीतर किमान एक महिना तरी प्रतीक्षा करावी लागते. हा खटाटोप टाळण्यासाठी काही जण दलालांचीही मदत घेतात. यातून सुटका करण्यासाठी परिवहन विभागाने घरबसल्या शिकाऊ लायसन्सची परीक्षा देण्याची सुविधा १४ जानेवारीपासून सुरू के ली. परिवहनच्या संके तस्थळावर

जाऊन आधार क्र मांक नोंदवून व अन्य काही प्रक्रि या पार पाडून परीक्षा दिली जात आहे. परंतु या सुविधेचा अनेक जण गैरफायदा घेत असल्याचे समोर आले.

गैरप्रकार रोखणार कसे?

इंटरनेट कॅ फे , महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कू ल किंवा अन्य कोणी याचा गैरफायदा घेणाऱ्यांवर पोलीस कारवाई तसेच उमेदवार लायसन्ससाठी कायमस्वरूपी अपात्र ठरेल, असा इशारा परिवहनने दिला आहे. गैरप्रकार रोखणार कसा हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. सध्या नवीन शिकाऊ  लायसन्सची परीक्षा देताना वेब कॅ मेऱ्याची सुविधा नाही. वेब कॅ मेरा असल्यास परीक्षा देणारा उमेदवार कोण हे समजण्यास मदत मिळेल. आरटीओ अधिकारी परीक्षा देणाऱ्यावर लक्ष देऊ शकतील, असे एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे वेब कॅ मेरा असल्यास घरबसल्या शिकाऊ  लायसन्स परीक्षा देता येईल. अन्यथा आरटीओत येऊनच उमेदवाराला परीक्षा देता येईल, असा नियम करण्याचा विचार आहे. सध्या वेब कॅ मेरा सुरू ठेवून परीक्षा घेण्याची प्रणाली कार्यान्वित करण्यासंदर्भात  चाचणीही सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.

३८ हजार जणांकडून लाभ

१४ जून २०२१ पासून घरबसल्या शिकाऊ लायसन्सची सुविधा सुरू झाली. आतापर्यंत ३८ हजार ९२७ जणांनी या सुविधेचा लाभ घेऊन परीक्षा पास झाल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 1:00 am

Web Title: turn on the webcam then take the test akp 94
Next Stories
1 उंच गणेशमूर्तींसाठी मंडळांची शासनदरबारी धाव
2 मजुरी थकवणाऱ्या कंत्राटदाराची हत्या
3 बेघर, मनोरुग्णांच्या लसीकरणासाठी धोरण आखा!
Just Now!
X