News Flash

जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…

या यशाबद्दल दोघी बहिणींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नालासोपा-यात राहणा-या आणि वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील विज्ञात शाखेत शिकणा-या आकांक्षा आणि अक्षता या जुळ्या बहिणींनी अनोखे जुळे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या दोघी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी दहावीला देखील दोन्ही जुळ्या बहिणी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या होत्या.

नालासोपा-याच्या भंडार आळीत राहणा-या आकांक्षा आणि अक्षता ठाकूर या जुळ्या बहिणी वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात विज्ञान शाखे शिकतात. गुरूवारी आलेल्या बारावीच्या निकालात आकांक्षाला ९२.९२ टक्के तर अक्षताला ९०.७६ टक्के गुण मिळाले. आकांक्षाला तर गणिता शंभरापैकी शंभर गुण मिळाले आहेत.

इयत्ता दहावीला देखील त्यांनी असेच यश मिळवले होते. दहावीला होलीक्रॉस शाळेतून अक्षता आणि आकांक्षा अनुक्रमे ९४.८० आणि ९४.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या होत्या. सलग दुस-या महत्वाच्या परीक्षेत दोन्ही जुळ्या बहिणींनी नव्वदीपार बाजी मारली आहे. आकांक्षाला वास्तुविशारद व्हायचं आहे तर अक्षताला लोकसेवा आयोगाची परिक्षा देऊन सनदी अधिकारी बनायचं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 11:43 am

Web Title: twin sisters unique twin success msr 87
Next Stories
1 १३० कोटींच्या तस्करीप्रकरणी फरार व्यापारी २३ वर्षांनी मुंबई पोलिसांच्या कचाट्यात
2 मुंबई: फोर्ट इमारत दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू, २३ जणांना काढलं बाहेर; बचावकार्य अद्याप सुरु
3 भाडय़ांच्या घरांची मागणी घटली!
Just Now!
X