News Flash

ट्विटरमुळे मलेशियातून तरुणाची सुटका

दोन आठवडय़ापूर्वी या तरुणाला चंडिगढस्थित एका दलालाने नोकरीचे अमिष दाखवून मलेशियामध्ये नेले होते.

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील २५ वर्षीय योगेश तिवारी हा तरुण ट्विटरच्या मदतीने मायदेशी परत आल्याची घटना रविवारी घडली.
दोन आठवडय़ापूर्वी या तरुणाला चंडिगढस्थित एका दलालाने नोकरीचे अमिष दाखवून मलेशियामध्ये नेले होते. मात्र मलेशियात दाखल झाल्यावर योगेशला न सांगता दलाल फरार झाला. योगेशकडे कामाचा व्हिसाही नव्हता. स्वत:कडील दीड लाख रुपये त्याने आधीच दलालाकडे दिल्याने त्याच्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते. अनोळखी देशात तगून राहण्यासाठी त्याने मिळेल ते काम केले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योगेशने आपली अवस्था ट्विटरच्या माध्यमातून सांगितली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने परराष्ट्र विभागाशी संपर्क केल्यानंतर मलेशियातील भारतीय दूतावासाच्या साह्य़ाने योगेशला भारतात आणण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 12:02 am

Web Title: twitter help to young girl released from malaysia
टॅग : Twitter
Next Stories
1 पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ७० बेटे विकसित करणार – नितीन गडकरींची घोषणा
2 ‘आयसिस’शी संबंधित १४ जणांना अटक, मुंब्र्यातूनही एकजण ताब्यात
3 मुंबईत भरधाव कारने चार जणांना चिरडले; कारचालकाला अटक
Just Now!
X